आता अनिल परबांना अटक व्हायला हवी : किरीट सोमय्या | पुढारी

आता अनिल परबांना अटक व्हायला हवी : किरीट सोमय्या

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज (दि.२६) सकाळी छापे टाकले. परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालये आणि मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे परब यांची आता अटक अटळ असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकारांशी बोलताना आज (गुरूवार) केला.

सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, ईडीकडे परब यांच्याविरोधात काही ठोस पुरावे आहेत. दापोलीत परबांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे सिद्ध झाले आहे. हा रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने नोव्हेंर २०२१ मध्ये आदेश दिले होते. परंतु यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. २ मेरोजी रिसॉर्ट पाडण्याची मुदत संपली.

हा रिसॉर्ट बांधण्यासाठी परब यांनी २५ कोटी वापरले आहेत. त्यासाठी त्यांनी ७ कोटी चेकने दिले आहेत. रिसॉर्ट बांधण्यासाठी काळा पैसा वापरण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. परब यांना अटक व्हायला व्हावी, परबांवर फौजदारी प्रक्रिया व्हायला व्हावी, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ईडीने गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात पहिल्यांदा मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापेमारी केली. यात परबांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी करुन काही कागदपत्रे आणि महत्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button