एका चुटकीत चार्जिंग होणारी पहिली इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॉन्च | पुढारी

एका चुटकीत चार्जिंग होणारी पहिली इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॉन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क :

कोरियाची किया ही ऑटोमोबाइल कंपनी कमी वेळात चार्जिंग होणारी Kia EV6 ही पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार आहे. पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असलेल्या या कारबद्दल जाणून घेवूया.

जून महिन्यात भारतात होणार लॉन्च

किया मोटर 2 जून 2022 रोजी EV6 नावाची आपली नवीन आणि पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार आहे. ही कार मे २०२१ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Kia EV6 Hyundai च्या inoniq 5 वर आधारित असून ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे.

१८ मिनिटांमध्ये ८० टक्के चार्जिंग

कियाची नवीन EV6 कार 18 मिनिटांमध्ये सुमारे 80 टक्के चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार सुमारे 528 किमी धावते. कारमध्‍ये 77.4 किलोवॅट बॅटरी आहे.

पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल

आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या कारला LED DRLs स्ट्रिप्स, LED हेडलॅम्प, सिंगल स्लॅट ग्लॉस ब्लॅक ग्रिल, ग्लोस ब्लॅक फिनिशसह रुंद एअरडॅम, ड्युअल-टोन अलॉय व्हील, ब्लॅक-आउट पिलर्स आणि ORVM, टेललाइट्स आणि ड्युअल टोन बंपर आहेत. पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, नवीन टू-स्पोक मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, AC साठी टच कंट्रोल, ट्रान्समिशनसाठी रोटरी डायल आणि सेंटर कन्सोलवर स्टार्ट-स्टॉप बटण आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button