Shikhar video : शिखर धवनची वडिलांकडून धुलाई ; जाणून घ्‍या काय आहे कारण? | पुढारी

Shikhar video : शिखर धवनची वडिलांकडून धुलाई ; जाणून घ्‍या काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क:

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. आयपीएलमध्‍ये त्‍याने दमदार कामगिरी केली;पण त्‍याचा संघ पंजाब हा प्‍ले ऑफपर्यंत मजल मारण्‍यास अपयशी ठरला. प्‍ले ऑफमधून बाहेर पडल्‍यानंतर तो घरी पोहचला. येथे त्‍याला वडिलांनी मारहाण केल्‍याचा व्‍हिडीओ त्‍याने शेअर केला आहे. ( Shikhar video ) जाणून घेवूया हा व्‍हिडीओमध्‍ये नेमकं काय आहे….

यंदाच्‍या आयपीएल हंगामात शिखर धवन पंजाबच्‍या संघात होता. त्‍याने १४ सामन्‍यांमध्‍ये ३८ धावांच्‍या सरासरीने ४६० धावा केल्‍या. यंदा आयपीएलमध्‍ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्‍ये तो चौथ्‍या क्रमांकावर आहे. शिखरची कामगिरी चांगली झाली असली तरी पंजाबचा संघ प्‍ले ऑफमध्‍ये पोहचण्‍यास अपयशी ठरला.

Shikhar video : घरी पाेहचताच वडिलांकडून धुलाई

शिखर जेव्‍हा घरी पोहचला. येथे त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला आयपीएल प्‍ले ऑफमध्‍ये का पोहचला नाही, अशी विचारणा करत लाथा-बुक्‍क्‍यांनी चांगलीच धुलाई केली. असा व्‍हिडीओ त्‍याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वास्‍तविक हा व्‍हिडीओ केवळ प्रेक्षकांच्‍या मनोरंजनासाठी आहे. शिखरच्‍या वडिलांनी मारण्‍याची आणि शिखरने मार खाण्‍याचा चांगला अभिनय या व्‍हिडीओमध्‍ये केला आहे.

शिखर व त्‍याच्‍या वडिलांचा अभिनय पाहून माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने इंस्‍टाग्रामवर कॉमेंट केली आहे की, तुझे वडील तर तुझ्‍यापेक्षाही चांगले अभिनेते आहेत. तर कॉमेंटेटर गौरव कपूर याने म्‍हटलं आहे की ” हा हा हा सारं कुटुंबच चांगला अभिनय करतय” शिखर धवनने या व्‍हिडीओला कॅप्‍शन लिहिली आहे की, आमचा संघ आयपीएल प्‍ले ऑफमध्‍ये पोहचला नाही म्‍हणून माझ्‍या वडिलांची ही प्रतिक्रिया आहे. यंदाच्‍या आयपीएल हंगामात पंजाबचा संघ सहाव्‍या क्रमांकावर राहिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

हेही वाचा : 

 

Back to top button