नाशिक : ‘ती’ एकाच मुलासोबत आठ वेळा पळून गेली, आठही वेळा पोलिसांनी शोधून आणलं | पुढारी

नाशिक : 'ती' एकाच मुलासोबत आठ वेळा पळून गेली, आठही वेळा पोलिसांनी शोधून आणलं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 15 वर्षीय मुलीने एकाच मुलासोबत आठ वेळा पलायन केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने शहर पोलिसांनी तातडीने तपास करून मुलीस सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले आहे.

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 5 मे रोजी सकाळच्या सुमारास 15 वर्षीय मुलगी दुकानात बिस्किट आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी न आल्याने पालकांनी इंदिरानगर पोलिसांकडे धाव घेत मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.  पोलिस तपासात मुलीकडे आईचा मोबाइल असल्याचेही समोर आले. पोलिसांच्या तांत्रिक तपासात मुलगी औरंगाबाद येथे असल्याचे समोर आले. त्यामुळे मध्यवर्ती गुन्हे शाखेंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे अंमलदार शंकर गोसावी यांनी औरंगाबाद येथील वडगाव कोल्हाटी येथे जाऊन अल्पवयीन मुलीस ताब्यात घेत तिच्या 19 वर्षीय प्रियकरालाही पकडले.

या प्रियकराचा ताबा इंदिरानगर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची व मुलाची सोशल मीडियावर ओळख झाली आहे. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत ही मुलगी प्रियकरासोबत आठ वेळा घरातून पळून गेली आहे. आठही वेळा पोलिसांनी तपास करून तिचा शोध घेतला आहे.

हेही वाचा :

Back to top button