सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९४९ नवे रुग्ण : २५ जणांचा मृत्यू
सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील 17 आणि परजिल्ह्यातील 8 अशा 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1 हजार 27 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दिवसभरात 1001 जण कोरोनामुक्त झाले. बुधवारी म्युकर मायकोसिसचे 2 नवे रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आजअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 38 हजार 837 झाली आहे. सध्या 8 हजार 348 व्यक्ती उपचाराखाली आहेत. आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या 2 हजार 318 तपासण्या करण्यात आल्या. यातील 364 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला. तर 7 हजार 843 जणांच्या अँटिजन टेस्ट केल्या. यात 606 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय : आटपाडी : 9, कडेगाव : 35, खानापूर : 57, पलूस : 98, तासगाव : 48, जत : 45, कवठेमहांकाळ : 32, मिरज :101, शिराळा : 81, वाळवा : 229, सांगली शहर : 176, मिरज : 38.
बुधवारी जिल्ह्यातील 17 तर परजिल्ह्यातील 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये आटपाडी 1, कडेगाव 1, खानापूर 2, पलूस 2, तासगाव 1, जत 1, मिरज 4, वाळवा 3, सांगली शहरातील 2 जणांचा मृत्यू झाला. तर पर जिल्ह्यातील कोल्हापूर 7 आणि सातारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यातील एकूण 3 हजार 948 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
आज परजिल्ह्यातील सोलापूर 5, कोल्हापूर 10, सातारा 2, पुणे 1 अणि कर्नाटकातील 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या 6 हजार 794 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
आजअखेर तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह
आटपाडी : 8519
जत : 11387
कडेगाव : 9634
कवठेमहांकाळ : 7448
खानापूर : 11002
मिरज : 15067
पलूस : 7341
शिराळा : 8120
तासगाव : 10633
वाळवा : 18880
महापालिका क्षेत्र : 30,886