परभणी : चालत्या मोटरसायकलने घेतला पेट | पुढारी

परभणी : चालत्या मोटरसायकलने घेतला पेट

पाथरी, पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील पोखर्णी फाटा येथे चालत्या मोटरसायकलने पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि.२५) रोजी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. या मोटरसायकल वर दोघेजण प्रवास करत होते.

शहराजवळील पोखर्णी फाटा येथून दोघेजण (एम. एच. २१ बि. के. ०८६१) दुचाकीवरुन पोखर्णी फाटा येथून पोखर्णीकडे निघाले असता दुचाकी थोडी पुढे जाताच मोटरसायकलच्या सायलन्सरमध्ये शाॅर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button