आश्वी परिसरात वाळूतस्करीला उधाण; वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्र अक्षरश: ओरबडलं जातंय | पुढारी

आश्वी परिसरात वाळूतस्करीला उधाण; वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्र अक्षरश: ओरबडलं जातंय

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या नियमानुसार वाळू ठेके बंद होऊन उपशावरही बंदी असताना संगमनेर शहर व आश्वी परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत असून चोरट्या पद्धतीने होणारी वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे.

अनेक दिवसापासून नदीपात्रासह आजूबाजूला साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांमधून वाळूची चोरी होत आहे. वाळूतस्करीच्या दोन गटांत विरोधी भास निर्माण झाल्याने आता रात्रीतील वाळूतस्करी उघड होत आहे. याबाबत प्रशासन अद्यापही झोपेतचअसल्याची चर्चा रंगू लागली आहे. अनेक ठिकाणी महसूलचे पथक नदीपात्राकडे जाऊन वाळूउपशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, प्रवरा नदी पात्रास वाळू तस्करीचे वरदानच म्हणावे लागेल.

दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रतीक्षा संपणार; प्रत्येक जिल्ह्याला मिळणार स्वतंत्र सॉफ्टवेअर

प्रवरा नदीपात्राला कित्येक वर्षांपासून वाळूतस्करी ग्रहण लागलेले दिसत आहे. कोठे ना! कोठे नदी पात्राच्या पोटातून तरुणाच्या सहकार्यातून वाळू चोरी होताना दिसत आहे. चोरटी वाळू उपशासाठी वाळू वाहतूकदारांची प्रशासनावर करडी नजर असते. त्यामुळे वाळूची वाहने पथकास चकवा देऊन पसार होत असल्याचेही प्रकार वेळोवेळी दिसून आले आहे. मुळात पथकाकडून कारवाई केली जाते की, केवळ सोपस्कार म्हणून पाहणी होत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे.

जळगावात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, दोन संशयित ताब्यात

वाळू गटातील उपशाची मुदत 30 सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही वाळू गटातून वाळूचा उपसा करू शकत नाही. असे असले तरी दररोज वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवरा अवैध वाळू वाहतुकीने वादविवाद वाढण्याची शक्यता असल्याने यांचा त्रास नाहक ग्रामस्थांना होवू शकतो. तेव्हा त्वरित वाळू वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनांनी कंबर कसावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button