Yasin Malik Terror Funding Case : नंदनवनात भारतविराेधी द्वेषाची ‘आग’ पसरवणारा दहशतवादी यासीन मलिक

Yasin Malik Terror Funding Case : नंदनवनात भारतविराेधी द्वेषाची ‘आग’ पसरवणारा दहशतवादी यासीन मलिक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्‍याप्रकरणी दहशतवादी यासीन मलिक (Yasin Malik) याला आज 'एनआयए' न्‍यायालयाने दोषी ठरवले आहे. त्‍याला जन्मठेपेची आणि १० लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. देशाचे नंदनवन म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या जम्‍मू-काश्‍मिरमध्‍ये द्वेषाची आग पसरवणार्‍या दहशतवाद्याविषयी,  जाणून घेऊया.

 Yasin Malik : वडील सरकारी नोकर, मुलगा भारताचा द्वेषी

१९६६ मध्‍ये श्रीनगरमध्‍ये जन्‍म झालेल्‍या यासिनचे वडील गुलाम कादिर मलिक हे सरकारी बसवर चालक म्‍हणून काम करत असत. त्‍याचे शिक्षण श्रीनगरमध्‍ये झाले. येथील श्री प्रताप कॉलेजमध्‍ये त्‍याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. ८० च्‍या दशकात यासीन मलिक याने भारतीय लष्‍कराविरोधात 'ताला पार्टी' स्‍थापन केली. याच पार्टीच्‍या माध्‍यमातून त्‍याने भारताविरोधात आग ओकण्‍यास सुरुवात केली.

१९८६ मध्‍ये त्‍याने ताला पार्टीचे नाव बदलत ते इस्‍लामिक स्‍टुडंट्‍स लीग (आयएसएल) असे केले. या पक्षात केवळ काश्‍मीरमधील तरुणांनाच प्रवेश देण्‍यात येत होता. भारतापासून काश्‍मिरला वेगळे करणे हाच एकमेव हेतू ठेवून हा पक्ष कार्यरत होता. यामध्‍ये अशफाक माजीद वानी, जावेद मीर आणि अब्‍दुल हमीद शेख असे दहशतवादी सहभागी झाले. काश्‍मीर वेगळं करण्‍याच्‍या नावाखाली हे दहशतवादी केवळ हिंसाचाराला खतपाणी घालत होते.

'जेकेएलएफ'चा एरिया कमांडर

जम्‍मू-काश्‍मिरमध्‍ये १९९८७ ला विधानसभा निवडणुका झाल्‍या. यावेळी यासीन मलिक यांच्‍या नेतृत्‍वाखालील आयएसएल हा पक्ष मुस्‍लीम युनायटेड फ्रंटमध्‍ये विलीन झाला. मात्र भारतीय लोकशाहीचा विरोध करत निवडणूक लढविण्‍यास नकार दिला. मात्र श्रीनगरमध्‍ये मुस्‍लीम युनायटेड फ्रंटच्‍या उमेदवाराचा प्रचार केला. यानंतर यासीन मलिक हा जम्‍मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा एरिया कमांडर झाला. याचचेळी त्‍याने भारतीय हवाई दलाच्‍या जवानांवर हल्‍ला घडवून आणला होता. यामध्‍ये हवाई दलाचे अधिकारी रवी खन्‍ना यांच्‍यासह चार कर्मचारी शहीद झाले.

काश्मीर पंडितांविरोधात भूमिका

१९९० मध्‍ये काश्मीर पंडियांविरोधातील हिंसाचारात यासीन मलिकचा सहभाग मोठा होता. याच काळात तो पाकिस्‍तानमधील दहशतवादी संघटनांच्‍य संपर्कात होता. काही वर्षातच तो जेकेएलएफचा प्रमुख झाला. त्‍याने १९९४ मध्‍ये ही संघटना राजकीय पक्ष म्‍हणून रुजविण्‍याची धडपड केली.

मकबूल भट्‍टला मानत होता आदर्श

यासीन मलिक हा जेकेएलएफचा प्रमुख मकबूल भट्ट याला आदर्श मानत होता. फुटीरवादी नेता, दहशतवादी मकबूल भटट्ट याला १८८४ मध्‍ये फाशीची शिक्षा सुनावण्‍यात आली होती.

पाकिस्‍तानी चित्रकाराशी विवाह

यासीन मलिक याने २२ फेब्रुवारी २००९ मध्‍ये पाकिस्‍तानी चित्रकार मुशाल हुसैन मलिक यांच्‍याशी विवाह केला. या दाम्‍पत्‍याला एक मुलगी आहे. पाकिस्‍तानची सहानभूती मिळवत भारताविरोधात कारवाई करत दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणार्‍या यासीन मलिकला अखेर भारतीय न्‍यायव्‍यवस्‍थेने लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news