ज्ञानवापी खटला वाराणसी फास्‍ट ट्रॅक न्‍यायालयाकडे वर्ग | पुढारी

ज्ञानवापी खटला वाराणसी फास्‍ट ट्रॅक न्‍यायालयाकडे वर्ग

वाराणसी : पुढारी ऑनलाईन
ज्ञानवापी प्रकरणी दाखल याचिका फास्‍ट ट्रॅक न्‍यायालयाकडे वर्ग करण्‍यात आल्‍या आहेत. वाराणसी वरिष्‍ठ दिवाणी न्‍यायालयाचे न्‍यायाधीश रवी दिवाकर यांनी हा आदेश दिला.  आता यापुढील ज्ञानवापी प्रकरणी सर्व सुनावणी ही फास्‍ट्र ट्रॅक न्‍यायालयात होणार आहेत. वाराणसी फास्‍ट ट्रॅक न्‍यायालयाचे न्‍यायाधीश महेंद्र पांडे यांच्‍यासमोर सुनावणी हाेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिद आणि काशी विश्वनाथ मंदिर वादात ज्ञानवापीत जो सर्वे घेण्यात आला त्यावर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पक्षांच्या सूचना आणि आक्षेप सादर करण्यासाठी दिवाणी न्‍यायालयाने मंगणवारी ७ दिवसांची मुदत दिली होती. आता यावरील सुनवणी फास्‍ट ट्रॅकमध्‍ये होणार आहे.

हा खटला दिवाणी स्वरुपाचा आहे. यात हिंदू भाविकांनी मशिदीच्या आवारात पूजेची परवानगी मागितली आहे. याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापी हे मुळचे मंदिर असून येथे हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तर Places of Worship Act 1991 नुसार हा खटला चालवता येणार नाही, असा आक्षेप मुस्लीम पक्षाचा आहे. या कायद्यानुसार देशातील सर्व धार्मिकस्थळांची स्थिती १५ ऑगस्ट १९४७ला जी होती तीच ठेवायची आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button