दु्र्दैवी ! भिंत कोसळून मजुराचा मृत्यू ;अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा | पुढारी

दु्र्दैवी ! भिंत कोसळून मजुराचा मृत्यू ;अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

पुणे : हडपसर भागातील एसपी इन्फोसिटीच्या आवारातील एका कार्यालयात प्रसाधनगृहातील भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अभियंत्यासह बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संग्राम बालाजी पांडे (वय 31, रा. खुपटवाडी, उंड्री चौक) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे.

दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभियंता साहिल निसार कारभारी (वय 29, रा. गुलमोहोर होरायजन, कोंढवा), ठेकेदार माधव गोविंदराव माने (रा. पारगेनगर, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत किसन तुकाराम माने (वय 37, रा. पारगेनगर, कोंढवा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 25 एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. पोलिस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button