Praveen Darekar : संभाजीराजेंना शिवसेना खेळवत आहे : प्रवीण दरेकर | पुढारी

Praveen Darekar : संभाजीराजेंना शिवसेना खेळवत आहे : प्रवीण दरेकर

मिरज : पुढारी वृत्तसेवा :  राज्यसभा खासदारकीच्या उमेदवारीवरून शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांना खेळवत आहे, अशी टीका भाजपचे नेते व विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आज ( मंगळवार) येथे केली. दरेकर यांनी जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी दैनिक पुढारीशी संवाद साधला.

ते (Praveen Darekar) म्हणाले की, संभाजीराजेंना भारतीय जनता पार्टीने कोणतीही अट न घालता ६ वर्षे खासदारकी दिली होती. आता शिवसेनेकडे संभाजीराजे यांनी खासदारकीसाठी साथ मागितली आहे. मात्र, शिवसेनेने त्यांना शिवसेनेत येण्याची अट घातली आहे. संभाजीराजेंना शिवसेना खेळवत आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

यावेळी मिरजेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, हेमलता कदम, समित कदम, विश्वगंधा कदम यांनी दरेकर यांचे स्वागत केले. यावेळी सम्राट महाडिक, दिनकर पाटील, सुरेश आवटी, निरंजन आवटी उपस्थित होते. त्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासही भेट दिली. यावेळी आमदार सुरेश खाडे, अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष मोहन वनखंडे उपस्थित होते.

दरेकर म्हणाले की, सध्या आघाडी सरकारकडून जे काही राजकारण चालू आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्याकडून वैयक्तिक आरोप केले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप कधी झाले नाहीत. राज ठाकरेंना भाजपने सुपारी दिली असल्याचे आघाडी सरकारचे आरोप त्यांनी खोडून काढले. ते म्हणाले, मनसे नेते राज ठाकरे हे जे बोलत आहेत, ते सर्व विषय आमचे आहेत. आमचेच विषय त्यांना बोलायला सांगायची आम्हाला काय गरज आहे. आम्ही कसलीही सुपारी राज ठाकरेंना दिली नाही. आणि अशी सुपारी त्यांना द्यायची गरज भारतीय जनता पार्टीला नाही. राज ठाकरे जी भूमिका मांडत आहेत, ती योग्यच आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button