Madhuri Pawar : रानबाजारमधील माधुरीच्या टकलेची चर्चा; शिव्याही शिकल्या | पुढारी

Madhuri Pawar : रानबाजारमधील माधुरीच्या टकलेची चर्चा; शिव्याही शिकल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रत्येक अभिनेत्रीला ग्लॅमरस किंवा बोल्ड कॅरॅक्टर एकदा तरी करायचं असतं. पण टक्कल करून प्रेक्षकांना काय वाटेल याची पर्वा न करता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ती भूमिका वठवण्याची हिम्मत मोजक्याच अभिनेत्री करतात. (Madhuri Pawar) हे मोठे शिवधनुष्य अभिनेत्री माधुरी पवार हिने लीलया पेलले आहे. तिच्या पहिल्याच ‘रानबाजार’ या वेबसिरीज मधून याची प्रचिती येते. कोणत्याही ‘स्टीरिओ टाईप’मध्ये न अडकता तिने तिच्या अभिनयाच नाणं खणखणीत वाजवल आहे. (Madhuri Pawar)

राजकारणातील एक महत्वकांशी आणि करारी स्त्री ची भूमिका अभिनेत्री माधुरी पवार हिने यामध्ये चोख बजावली आहे. अलीकडच्या काळात ग्लॅमरस दुनियेत जिथे अभिनेत्री आपल्या लुक बद्दल इतक्या जागरूक असतात अशा वेळेस माधुरीने टक्कल करून भूमिका साकारणे हे खरंच वाखाण्याजोगे आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये प्रेरणा सायाजीराव पाटील साने ही राजकीय स्त्री व्यक्तीरेखा माधुरीने उत्तम निभावली आहे.

वडिलांच्या निधनानंतर राजकीय वारसासाठी तिने केलेली खेळी. जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनानंतर तिने स्वतःचे केलेले मुंडन अन् त्याच बाल्ड लुकमध्ये तिने पुढे सुरू ठेवलेला राजकीय प्रवास हा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढविणारा आहे. हनी ट्रॅप, राजकारण आणि त्यामध्ये प्रेरणाचं पुढचं पाऊल काय असेल? याची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात आता निर्माण झाली आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना माधुरी पवार म्हणते, अशी भूमिका मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षित होते. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली. राजकीय व्यक्तींना भेटले. त्यांच्या देहबोलीचा भाषेचा आभ्यास केला. राजकारणातील स्त्रियांच्यावरील पुस्तक वाचली. इतकेच नव्हे तर शिव्याही शिकले. व्यक्तिरेखेसाठी अक्षरशः शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस केली. यामुळेच ही भूमिका आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेरणा सायाजीराव पाटील साने या भूमिकेमुळे माझी अभिनयाच्या भूक भागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Back to top button