Krishna Janmabhoomi : कृष्‍ण जन्‍मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादावर मथुरा न्‍यायालयात होणार सुनावणी | पुढारी

Krishna Janmabhoomi : कृष्‍ण जन्‍मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादावर मथुरा न्‍यायालयात होणार सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
मथुरेतील कृष्‍ण जन्‍मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादावर सुनावणी होणार आहे. ( Krishna Janmabhoomi ) याप्रकरणी वकील रंजना अग्‍निहोत्री यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीस मथुरा जिल्‍हा न्‍यायालयाने परवानगी दिली आहे. शाही इदगाह मशिदीची जमीन श्री कृष्‍ण जम्‍नस्‍थान ट्रस्‍टला परत मिळावी, अशी मागणी या याचिकेतू करण्‍यात आली आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे वकील रंजना अग्‍निहोत्री यांनी अयोध्‍या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता त्‍यांनी कृष्‍ण जन्‍मभूमी प्रश्‍नी याचिका दाखल केली आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, मथुरेतील १२. ३७ एकर जमिनीवर श्रीकृष्‍ण जन्‍मस्‍थळ आहे. याच जमिनीवर शाही इदगाह मशीद उभारण्‍यात आली आहे. ही जमीन श्रीकृष्‍ण जम्‍नस्‍थान ट्रस्‍टला परत मिळावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

मथुरा जिल्‍हा न्‍यायालयात कृष्‍ण जन्‍मभूमी इदगाह मशीद वाद प्रकरणाची सुनावणी ६ मे रोजी पूर्ण झाली होती. सर्व
युक्‍तीवाद झाल्‍यानंतर न्‍यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. याप्रकरणी १९ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button