मांडवा जेट्टी येथे मच्छिमार बोट बुडाली ; उधाणाच्या भरतीचा तडाखा | पुढारी

मांडवा जेट्टी येथे मच्छिमार बोट बुडाली ; उधाणाच्या भरतीचा तडाखा

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : उधाणाच्या भरतीच्या लाटांचा मंगळवारी मांडवा जेट्टीला तडाखा बसला असून एक मच्छिमार बोट समुद्रात बुडाली आहे.

सागरकृपा मच्छिमार बोट बुडाल्यानंतर उधाणाच्या लाटांचा तडाखा अजुनही कायम आहे. आज मांडवा जेट्टी येथील सासवणे येथे नयन कोळी यांची एकविरा आई ही मच्छिमारी बोट बुडाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. बुडालेली बोट ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर  काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मांडवा सांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजीव पाटील यांनी दिली.

Back to top button