सांगलीत घर फोडले; दागिने, रोकड लंपास | पुढारी

सांगलीत घर फोडले; दागिने, रोकड लंपास

सांगली पुढारी वृत्तसेवा : येथील शंभरफुटी रस्त्यावरील मुस्ताक रफीक शेख या रिक्षाचालकाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड मिळून 55 हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी रात्री चोरीची ही घटना उघडकीस आली. दरम्यान, शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

रफीक शेख पाकिजा मस्जीदमागे साई कॉलनीत गल्ली क्रमांक दोनमध्ये राहतात. शेख कुटुंबासह दि. 14 मे रोजी सायंकाळी त्यांच्या सासरवाडीला गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी शेख यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला. स्वयंपाक खोलीत कपाट होते. त्याला कुलूप होते. हे कुलूप चोरट्यांनी तोडले. लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा 55 हजारांचा ऐवज लंपास केला. हॉलमधील साऊंड सिस्टीमही चोरट्यांनी पळविली.शेख कुटुंब रविवारी रात्री घरी आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. शहर पोलिसांनी पंचनामा केला. शेख यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केली असण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरात बंद घरे चोरटे फोडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

 

 

Back to top button