777 Charlie : यशच्या केजीएफ नंतर रक्षित शेट्टीचा ‘७७७ चार्ली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

777 Charlie : यशच्या केजीएफ नंतर रक्षित शेट्टीचा ‘७७७ चार्ली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांत बॉलीवूडने बॉक्स ऑफिसवर निराशा केली आहे, पण हिंदी प्रेक्षक केजीएफ २ (KGF: Chapter 2) या चित्रपटामुळे थक्क झाले आहेत. यश स्टारर हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्या नंतरही करोडोंची कमाई करत आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ने पहिल्या वीकेंडमध्ये १२ कोटी रुपयांचीही कमाई करु शकला नाही. केजीएफ २ ने रविवारी ३२ व्या दिवशीही हिंदी आवृत्तीतून सुमारे ३ कोटी रुपयांची कमाई केली. याचा परिणाम असा झाला की, या चित्रपटाने आतापर्यंत केवळ हिंदी व्हर्जनमधून ४२१.८८ कोटींची कमाई केली आहे. एवढेच नाही तर रविवारी देशभरात ५ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ८४०.७२ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरातील कमाईचे आकडे आता १२०० कोटींपासून काही अंतर दूर आहेत. (777 Charlie)

होय, केजीएफ २ ने जगभरात ३२ दिवसांत ११९८.२४ कोटी रुपये नेट कलेक्शन केले आहे. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही ही बातमी वाचत आहात, त्याचवेळी प्रशांत नीलचा हा चित्रपट १२०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असेल. पण यादरम्यान, बॉलिवूडसाठी ‘७७७ चार्ली’ हा चित्रपट धोक्याची घंटा म्हणजे ठरु शकतो. ज्याचा ट्रेलर (७७७ चार्ली ट्रेलर) सोमवारीच रिलीज झाला. (777 Charlie)

केजीएफ २ मुळचा कन्नड चित्रपट आहे. या चित्रपटाने यशला कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार बनवला. यश आणि किच्चा सुदीप नंतर कन्नड चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव म्हणजे रक्षित शेट्टी. आता रक्षित शेट्टी याचा ‘७७७ चार्ली’ (777 Charlie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला.

केजीएफ २ ने ज्या पद्धतीने हिंदी पट्ट्यातील तिकट खिडकीवर बंपर कमाई केली आहे. त्याच पद्धतीने रक्षित शेट्टी याचा ‘७७७ चार्ली’ हा चित्रपट देखिल बॉलिवूडच्या चित्रपटांना चांगली फाईट देऊ शकतो. त्यामुळे केजीएफच्या धर्तीवर रक्षित शेट्टी याचा ‘७७७ चार्ली’ हा चित्रपट देखिल पॅन इंडिया रिलिज केला जात आहे. १० जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

का होत आहे ‘७७७ चार्ली’ या चित्रपटाचे कौतुक

‘७७७ चार्ली’ (777 Charlie) या चित्रपटात धरम आणि त्याच्या कुत्र्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. या दोघांमध्ये अत्यंत घट्ट नाते असते. दोघे एका प्रवासासाठी निघतात आणि या प्रवासात दोघांच नातं आणखी घट्ट बनतं. या चित्रपाटच्या ट्रेलरचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटातील दृष्य आणि बॅकग्राऊंड संगीताने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातात. मागील काही काळापासून बॉलीवूडचे सिनेमे ज्या पद्धतीने अपयशी होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा कल दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे ‘७७७ चार्ली’ हा चित्रपट देखिल हिंदी पट्ट्यात चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने पुन्हा केजीएफ प्रमाणे कामगिरी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र बॉलीवूडसमोरचे हे मोठे संकट आणि आव्हान असणार आहे.

Back to top button