स्वदेशी एअर इंडियाला विदेशी ‘बॉस’ मिळाला ! कॅम्पबेल विल्सन यांची CEO म्हणून नियुक्ती | पुढारी

स्वदेशी एअर इंडियाला विदेशी 'बॉस' मिळाला ! कॅम्पबेल विल्सन यांची CEO म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : टाटा सन्सकडून सिंगापूरस्थित माफक किंमतीमधील Scoot एअरलाईन्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाच्या कार्यकारी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

कॅम्पबेल विल्सन यांनी स्कूट एअरलाईन्समध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. ही कंपनी सिंगापूर एअरलाईन्सची उपकंपनी आहे.

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विल्सन कॅम्पबेल यांच्या नावाची घोषणा करताना टाटा सन्सचे एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, मी कॅम्पबेल यांचे एअर इंडियामध्ये स्वागत करण्यास उत्सुक आहे. ते औद्योगिक क्षेत्रातील दिग्गज असून त्यांनी जागतिक बाजारपेठेत बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्त्वांच्या पदावर काम केलं आहे. एअर इंडिया ब्रँड आशियामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.

टाटासारख्या आदरणीय ग्रुपचा भाग असलेल्या एअर इंडिया त्यांची निवड करणे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कॅम्पबेल विल्सन यांनी यापूर्वी, एसआएसोबत कॅनडा, हाँगकाँग आणि जपानमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. ते स्कूट (Scoot) एअरलाईन्सचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी २०१६ पर्यंत जबाबदारी सांभाळली. त्यांनंतर २०२० मध्ये पुन्हा स्कूटमध्ये त्याच पदावर आले.

यापूर्वी एअर इंडियाच्या CEO पदास इल्कर आयसींचा नकार

र्कीचे इल्कर आयसी यांनी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होण्याची ऑफर नाकारली होती. टाटा सन्सने १४ फेब्रुवारी रोजी तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख इल्कर आयसी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती.

इल्कर आयसी यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार होती. एका अहवालानुसार, प्रस्थापित परंपरेनुसार, भारतातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केलेल्या सर्व परदेशी नागरिकांची पार्श्वभूमी तपासली जाते आणि इल्कर आयसी यांच्या बाबतीतही तेच करायचे होते. दरम्यान, आणखी एका अहवालात असेही म्हटले आहे की, इल्कर आयसी पाकिस्तानचे मित्र मानले जाणारे तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगन यांचे सल्लागार म्हणूनही काम केले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button