शिवानी- विराजस यांच्या खास स्वागत समारंभातील क्षण (फोटोज) | पुढारी

शिवानी- विराजस यांच्या खास स्वागत समारंभातील क्षण (फोटोज)

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांचे शुभमंगल नुकतेच मोठ्या थाटामाटात पार पडले आहे. शिवानी- विराजस याच्या विवाह सोहळ्यातील मेहंदीच्या कार्यक्रमापासून ते एकमेकांच्या गळ्यात वरमाळा परिधान करण्यापर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या स्वागत समारंभाचे आणखी काही खास फोटो समोर आले आहेत.

अभिनेत्री शिवानी आणि विराजसच्या इंस्टाग्रामवर स्वागत समारंभाचे आणखी काही खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत शिवानी भरजरी असलेल्या लहेग्यांत तर विराजस शेरनानीत खूपच सुंदर दिसत आहेत. मोजकेच नातेवाईकाच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आहे. तर काही फोटोत शिवानी जांभळ्या आणि लाल रंगाच्या पैठणीत खूपच सुंदर दिसतेय. लग्नात तिने लाल रंगाच्या साडीवर कमरपट्टा, आणि नाकात नथ घातलेली दिसतेय. तिचे मधूर हास्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. लग्नानंतर शिवानीच्या चेहऱ्यावर तेज चमकत आहे.

नुकतेच तिने जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो इंन्टाग्रामवर सध्या व्हायरल होत आहेत. यावेळी गळ्यात मंगळसुत्रासोबत मोत्याचे दागिने परिधान केल्याने तिच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत. शेअर केलेल्या लग्नातील व्हिडिओमध्ये शिवानी आणि विराजस दोघेजण वर आणि वधूच्या पोशाखात आनंदीत दिसत आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. याआधी शिवानीने आपल्या लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले होता. तिने हे फोटो शेअर करताना ‘Finally! ❤️’. असे म्हटले होते. यासोबत तिने एक हार्ट इमोजी शेअर करत #married #couple #thisisus असे टॅगदेखील दिले होते.

याशिवाय तिच्या घरातील मेहंदीचा कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून शिवानीचा विवाह थाटामाटात पार पडला आहे. स्वागत समारंभात शिवानीची सासू मृणाल कुलकर्णी सिल्क साडीत तर शिवानीची आई आनंदीत दिसतेय. याशिवाय दोघांनी काही नातेवाईसोबत फोटोशूट केले आहे.

विराजसने ‘माझा होशील ना’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून काम केले आहे. या मालिकेतून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. शिवानी रांगोळेदेखील ‘सांग तू आहेस का?’ मालिकेत भूमिका केली होती. तिचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील लूक लक्षवेधी ठरला होता.

‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ ही तिची मालिका गाजली होती. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली होती. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ‘बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली.

हेही वाचलंत का? 

Back to top button