shuddhi kadam
shuddhi kadam

मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादची महाविजेती ठरली शुद्धी कदम

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

छोट्या पडद्यावरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे आणि राजयोग धुरी. सायली ठाक तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. सिद्धांत मोदी आणि राधिका पवारला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. विजेती शुद्धी कदमला चार लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यातलं उत्तम सादरीकरण तिला विजेतेपद देऊन गेलं. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे शुद्धी कदम आणि तिचे कुटुंबीय आनंदात आहेत. शुद्धीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर तिला गाण्याचे वेगवेगळे प्रकार सादर करता आले. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, अविनाश-विश्वजीत गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळाल्याची भावना शुद्धीने व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news