डोंबिवलीत मनसेला धक्का, दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश? | पुढारी

डोंबिवलीत मनसेला धक्का, दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश?

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिका क्षेत्रातील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील घडामोडींना वेग आला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मनसेचे नगरसेवक प्रभाकर जाधव (प्रभाग क्रमांक १२२ निळजे घेसर) आणि पूजा गजानन पाटील (प्रभाग क्रमांक १२१, कटाई -घरीवली) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवनीत आणि रवी राणा | आक्षेपार्ह वक्तव्ये, पण राजद्रोह नाही : मुंबई कोर्ट

तसेच यावेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मनसे कल्याण तालुका प्रमुख गजाजन पाटील हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश आज दुपारी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१५ च्या निवडणुकीत मनसेचे एकूण ९ नगरसेवक निवडून आले होते. तर प्रभाकर जाधव हे अपक्ष निवडून आल्यानंतर मनसेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर पालिकेत मनसेचे विरोधी पक्ष नेता पद भूषविणारे मंदार हळबे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. आता पुन्हा मनसेचे काही नगरसेवक सेनेत प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button