सोलापूर : लोकराजाला १०० सेकंद उभे राहून वंदन, स्तब्ध झाले सोलापूरकर | पुढारी

सोलापूर : लोकराजाला १०० सेकंद उभे राहून वंदन, स्तब्ध झाले सोलापूरकर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष २०२२ हे असून महाराष्ट्र शासन हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करत आहे. या कृतज्ञता पर्वात शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समिती, सोलापूर यांच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६ मे, २०२२ रोजी सकाळी १० वाजता शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून वंदन करण्यात आले. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हे वंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे, शताब्दी समितीचे विश्वस्त माऊली पवार, आशुतोष तोंडसे, सचिन शिंदे, नाना काळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, मनोहर सपाटे, राजन जाधव, अजित बनसोडे, धर्मेंद्र चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे,श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, मदन पोलके, सुभाष गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान संयोजक माऊली पवार यांनी या वंदन कार्यक्रमामधील समितीच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली.

Back to top button