कल्का-सिमला पर्वतीय रेल्वे | पुढारी | पुढारी

कल्का-सिमला पर्वतीय रेल्वे | पुढारी

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेल्या कल्का-सिमला पर्वतीय रेल्वेची सुरुवात 1898 साली झाली. या नॅरो गेज रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा रेल्वेमार्ग हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागातून जातो. या रेल्वेतून प्रवास करताना विहंगम दर्‍याखोर्‍या, पर्वत, शिखरे यांचे दर्शन होते.

तत्कालीन ब्रिटिश राजवटीची उन्हाळी राजधानी सिमल्याला उर्वरित भारताबरोबर जोडण्यासाठी या रेल्वेची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाचे मुख्य अभियंते एच. एस. हॅरिंग्टन होते. हा रेल्वेमार्ग सुरू करणे एक कठीण साहस होते. याचे कारण अनेक दर्‍या, पर्वत या मार्गाच्या आड येत होते. पर्वतांमधून सुमारे 107 बोगदे तयार करण्यात आले व  864 पूल बांधण्यात आले तेव्हा कुठे हा रेल्वे मार्ग तयार झाला.

96 कि.मी. मार्गाच्या या रेल्वेमार्गावर एकूण 18 रेल्वे स्थानके आहेत. हिमालयातील शिवालिक पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या कल्कापासून या रेल्वेमार्गाला सुरुवात होते. धरमपूर, सोलन, कंदाघाट, तारादेवी, बरोग अशी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थानके घेत ही रेल्वे सिमल्यापर्यंत पोहोचते.
 

संबंधित बातम्या

Back to top button