कोल्हापूर : वाहतूक दंडामुळे घर-दार विकायची वेळ येईल : चंद्रकांत पाटील | पुढारी

कोल्हापूर : वाहतूक दंडामुळे घर-दार विकायची वेळ येईल : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वेगाने वाहन चालवले म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड भरला, तसाच दंड मीही भरला आहे. अगोदर रस्ते चांगले नव्हते. वाहने पळत नव्हती. पण आता वाहने आणि रस्तेही चांगले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढतो. मात्र आता वाहनांना वेग मर्यादा बंधनकारक केली आहेे. ही मर्यादा वाढवण्याची गरज आहे. नाही तर वाहतूक नियमांच्या दंडामुळे घर-दार विकायची वेळ येईल, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. भाजपचा अजेंडा चालवून कोणाचे अस्तित्व धोक्यात येणार नाही.

भाजपचा अजेंडा कोणीही चालवत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. टक्केवारी वाढल्याचे समृद्ध महामार्गाच्या दुरवस्थेवरून स्पष्ट होते, असा आरोपही त्?यांनी ठाकरे सरकारवर केला.

मनसेसोबत युतीचा प्रस्ताव नाही

राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भूमिकेवरून भविष्यात किंवा मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे युतीची चर्चा आहे. त्यावर पाटील यांनी मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट केले.

राजद्रोह या कलमाचा गैरवापर थांबवावा, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. राजद्रोह, देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जातो. ‘मातोश्री’च्या समोर हनुमानचालिसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो? सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून हे संपवले पाहिजे.

Back to top button