एवढी ताकद आणली कोठून? ४ वर्षीय मुलीने आधी कॅन्सर आता कोरोनावर केली मात  | पुढारी

एवढी ताकद आणली कोठून? ४ वर्षीय मुलीने आधी कॅन्सर आता कोरोनावर केली मात 

दुबई : पुढारी ऑनलाईन 

दुबईमध्ये राहणारी भारतीय वंशाची ४ वर्षांच्या मुलीने आधी कॅन्सरवर मात केली. नंतर, कोरोनाला ही हरवले आहे. तिच्यात इतकी ताकद आली कोठून? हे पाहून डॉक्टरदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. असं म्हटलं जात आहे की, यूएईमध्ये कोरोनाने रिकव्हर झालेल्या रूग्णांमध्ये ती सर्वात छोट्या वयाची मुलगी आहे. तिला कॅन्सर होता. आणि मागील वर्षी तिने कॅन्सरवर मात केली होती. आता कोरोनाने बाधित झाल्यानंतर तिच्या कुडुंबीयांची चिंता वाढली होती. परंतु, आता तिने कोरोनावरही यशस्वीपणे मात दिली आहे. त्यामुळे तिच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाने बाधित झाल्यानंतर तिला १ एप्रिलला अल-फुतैमिम हेल्थ हबमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची आई एक आरोग्य कर्मचारी आहे. तिच्या संपर्कात आल्यानंतर मुलीलाही लागण झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुलीची आणि तिच्या वडिलांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. वडील सुरक्षित आहेत. मुलीला विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कारण मागील वर्षी ती किडनीच्या एका दुर्लभ कॅन्सरने पीडित होती. तिला २० एप्रिलला रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. 

डॉक्टरदेखील आश्चर्यचकित 

अल-फुतैमित हेल्थ हबचे मेडिकल डायरेक्टर म्हणाले की, ‘तिला मागील वर्षी किमोथेरेपीची ट्रिटमेंट देण्यात आली होती. त्यामुळे तिची प्रतिकार क्षमता अद्यापही कमकुवत आहे.’ ते म्हणाले की, डॉक्टरांना भीती होती की, तिची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. सुदैवाने तिला अन्य त्रास झाला नाही. जेन वेळा चाचणी केल्यानंतर तिचा निगेटिव्ह अहवाल आला आहे. त्याआधी तिच्यावर २० दिवस उपचार करण्यात आले. आता तिला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

 

Back to top button