इराणचे शास्त्रज्ज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची गोळ्या झाडून हत्या | पुढारी

इराणचे शास्त्रज्ज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची गोळ्या झाडून हत्या

तेहरान  : पुढारी ऑनलाईन 

इराणचे टॉप अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची भररस्त्यात गोळ्या घालून करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येच्या वृत्तानंतर इराणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तेहरानजवळ दामवंद येथे २७ नोव्हेंबर, २०२० रोजी घडली. मोहसीन फखरीजादेह यांचे देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान होते. 

इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ यांनी या दहशतवादी घटनेत इस्त्राएलचा हात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ही एक गंभीर घटना आहे. मोहसीन फखरीजादेह यांना ‘इराणी अणुबॉम्बचा जनक’ मानले जात होते. त्यांना ”द फादर ऑफ ईरानियन बॉम्ब” चा दर्जा इराणी सरकारने दिला होता. 

इराणच्या गुप्त अण्वस्त्र शस्त्रांच्या कार्यक्रमामागे मोहसीन फखरीजादेह यांचा हात होता. मोहसीन इराणमधील एका युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्सचे प्रोफेसर होते.  मीडिया रिपोर्ट्समुसार, मोहसीन शुक्रवारी दामवंदमध्ये अब्सार्ड सिटी येथे होते. येथे त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या आणि बॉम्बने हल्ला केला. जागीच त्यांचा मृत्यू झाला. 

Back to top button