पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे वधू-वराची मिरवणूक चक्क बैलगाडीतून ; कुठे ? बघाच | पुढारी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे वधू-वराची मिरवणूक चक्क बैलगाडीतून ; कुठे ? बघाच

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे एका विवाहसोहळ्यात वधू-वराची मिरवणूक चक्क बैलगाडीतून काढण्यात आल्याने हा विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.  नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात देवगाव नावाचे गाव आहे. येथील सचिन सोमनाथ निकम व नांदूर येथील कोमल राजेंद्र शिंगवे यांचा विवाहसोहळा देवगाव येथे नुकताच झाला. परंतू पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे या वधू-वराची मिरवणूक बैलगाडीतून काढण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. एवढच नाही तर वधूचा गृहप्रवेशही बैलगाडीतून प्रवास करीत झाला.

लग्नसोहळा म्हटल्यावर चकाचक वाहने, बॅण्ड आणि डीजेच्या आवाजात निघालेली वरात, डीजेच्या तालावर नाचणारे वर्‍हाडी असे चित्र सर्रास दिसते. मात्र, पेट्रोलचा न परवडणारा खर्च पाहाता या सोहळ्यात वधू-वराची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. इंधनाचे दर आवाक्याबाहेर चालल्याने आपण वरातीसाठी व वधूला घरी नेण्यासाठी या बैलगाडीचा वापर करणार असल्याचे नवरदेवाने सांगितल्यानंतर वर्‍हाडींनी या निर्णयाचे कौतुक केले. येथील जगदंबा माता मंदिर परिसरात हा विवाहसोहळा पार पडला.

हेही वाचा :

Back to top button