पुणे : इस्टेट एजंटवर हनीट्रॅप; उकळली 44 लाखांची खंडणी | पुढारी

पुणे : इस्टेट एजंटवर हनीट्रॅप; उकळली 44 लाखांची खंडणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

विमानतळ परिसरातील एका रिअल इस्टेट एजंटला हनीट्रॅपमध्ये खेचून तरुणी व तिच्या दोघा साथीदारांनी एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल 44 लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. दोघांचे संबंध असल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन हे कृत्य केले आहे.
विविध कारणांसाठी महिलेने इस्टेट एजंटकडून पैसे उकळल्यानंतर सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून शेवटी धाडस करून एजंटने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून वर्षा कोंडीबा जाधव (वय 29) हिला अटक करण्यात आली आहे.

न्यायव्यवस्थेवरील टीका भोवली : संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल

न्यायालयाने तिला 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, तिचे साथीदार पौर्णिमा कोंडीबा जाधव व आकाश कोंकरे यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी विमाननगर येथील 38 वर्षीय एजंटने तक्रार दिली होती. ही घटना सप्टेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान घडली.

भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल; धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरात आरोपी वर्षा हिचे सलून आहे. या ठिकाणीच फिर्यादी यांची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर मैत्रीच्या जाळ्यात खेचून आरोपीने फिर्यादी यांच्याकडून सुरुवातीला सलूनच्या कामासाठी चार लाख रुपये उसने घेतले होते. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फोन करून व घरी येऊन फिर्यादी यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी यांनी त्यांचा विवाह झाल्याचे सांगितले. त्यानंतरदेखील महिलेने फोन करून व त्यांच्या घरी येत लग्न करायचे असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. गुन्हा न दाखल करण्यासाठी एजंटकडून वेळोवेळी 19 लाख 55 हजार खंडणी घेतली. तसेच, मुंबई येथून एका सराफाच्या दुकानातून 22 लाख रुपयांचे सोने खरेदी करून ते पैसे फिर्यादी यांना देण्यास लावले. सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने
करीत आहेत.

वाढत्या कोरोना केसेसमुळे दिल्लीत आता मास्क अनिवार्य होणार, न लावल्यास ५०० रुपये दंड

फिर्यादीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी वर्षा ही सतत फिर्यादींना फोन करून ब्लॅकमेल करून पैशासाठी व प्रॉपर्टी नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होती. वर्षाने फिर्यादींना त्यांचे मृत्यूपत्र तयार करण्यास सांगून सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्यास सांगितले होते. तसेच पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्यासाठी तगादा लावत होती. फिर्यादी वर्षाच्या त्रासाला कंटाळले होते. त्यातूनच त्यांनी 6 मार्च रोजी रात्री वर्षा हिच्या कोरेगाव पार्क परिसरातील घराजवळ जाऊन स्वतःच्या हातावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

न्यायालय : विधवा सुनेने दुसरे लग्न केले, तर मुलाच्या पेन्शनवर आई-वडिलांचा अधिकार

पोलिस आणि गँगस्टर माझ्या ओळखीचे

‘तू काही नाटक केले तर याद राख. बरेच पोलिसवाले माझ्या ओळखीचे आहेत, तर नुसते पोलिसवाले नाही तर गँगस्टरसुद्धा माझ्या परिचयाचे आहेत. तू महाराष्ट्रात अथवा पंजाब, राजस्थान कोठेही जा, तेथे माझी लोकं आहेत. त्यांना मी नुसते सांगितले तरी तुला कधी संपवून टाकतील. याचा पत्ता लागणार नाही,’ अशाप्रकारे वर्षा फिर्यादींना धमकावत होती.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत २,०६७ नवे रुग्ण, ४० मृत्यू

खंडणी उकळल्याप्रकरणी मुख्य आरोपी महिलेला अटक केली आहे. जर अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क करावा.

                                                     – भरत जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ

Back to top button