भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल; धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य | पुढारी

भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल; धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य

सांगली, पुढारी वृत्तसेवा : छत्रपतींनी उभा केलेल्या रयतेच्या स्वराज्याला अभिप्रेत असणारे राजकारण शरद पवार करीत आहेत. त्यांनी अठरा पगड जातीतील कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांना जातीयवादी म्हणता? ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून येऊन राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल. असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहेत.  सांगली येथील नाट्यगृहात आयोजित ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’च्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेली धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकारणाचा नव्हे, तर श्रद्धेचा विषय आहेत.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  म्हणाले, 14 हजार किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात परिवार संवाद यात्रेद्वारे 34 जिल्ह्यातील, 353 तालुक्यातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. राष्ट्रवादी पक्ष हा गोरगरिबांना उभा करणारा, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेणारा पक्ष आहे. परिवार संवाद यात्रेमुळे सबंध राज्याच्या कानाकोपर्‍यात राष्ट्रवादीला बळकटी आली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, देशातील धर्मांधता आपल्या देशाला पाकिस्तान, श्रीलंकेसारखे अराजकतेकडे नेत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीने, महागाईने सामान्य जनता होरपळत आहे. सध्या पुरंदरे, जेम्स लेन यांना पुढे आणून नवा ट्रॅप आणला जात आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. आपली वाटचाल अशीच राहिली तर या देशाचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. आपण चांगले विचार संपवायला निघालोय. नथुराम गोडसेच्या पिलावळीने दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश यांना संपविले. मात्र त्यांचे विचार कधी संपणार नाहीत.

हेही वाचलतं का?

Back to top button