कोल्हापूर : गॅस सबसिडी बंद… | पुढारी

कोल्हापूर : गॅस सबसिडी बंद...

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले
दोन वर्षांपासून घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद झाली आहे. ग्राहकांना शेवटची सबसिडी एप्रिल 2020 मध्ये मिळाली होती. तेव्हा गॅस सिलिंडरचा दर 729 रुपये होता व सबसिडी 145 रुपये मिळाली होती. आज सिलिंडरचा दर 1,050 रुपये झाला आहे; मात्र सबसिडी बंद आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचे दर निश्‍चित केले जात होते. यावर केंद्र शासनाचे फारसे नियंत्रण नव्हते. 2013 साली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पहिल्या सहा सिलिंडरसाठी सबसिडी जाहीर केली; पण भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वच वर्षभरातील बारा सिलिंडर वापरावर सबसिडी जाहीर केली. ग्राहकांवर गॅस सिलिंडर दरवाढीचा भार पडू नये, यासाठी ग्राहकांच्या खात्यात सबसिडी जमा करण्?याची तरतूद केंद्र सरकारने केली. त्याप्रमाणे गॅस कार्डधारकाच्या बँकेला आधार कार्ड लिंक केले आहे अशा ग्राहकांच्या खात्यात काही दिवसांत जादाचे पैसे जमा होऊ लागले. ग्राहकांना सबसिडी मिळत असल्याने गॅस दरवाढीबाबत फारशी तक्रार नव्हती.

पण, गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत चालल्या आहेत. सिलिंडरचा दर हा एक हजार रुपयांवर गेला आहे; पण सरकार आता सबसिडीचे नावच काढत नाही. यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये सिलिंडरवर सबसिडी मिळाली होती. त?यानंतर सबसिडी बंदच आहे. पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली आहे. महागाईने त्रस्?त जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सिलिंडर सबसिडी पूर्ववत सुरू करण्?याची मागणी होत आहे.

Back to top button