अबब ! दोन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, एक हजार किलो कांद्याची चटणी | पुढारी

अबब ! दोन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, एक हजार किलो कांद्याची चटणी

पारगाव : पुढारी वृत्तसेवा

अबब ! दोन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, एक हजार किलो कांद्याची चटणी, असा महाप्रसाद श्री.हनुमान जन्मोत्सवानिमित्त तयार झालाय थोरांदळे ( ता .आंबेगाव) येथे … यात्रेकरू, भाविकांना ‘पुरी गुळवणीचा’ महाप्रसाद देण्याची ही जुनी परंपरा आजही थोरांदळेकरांनी टिकून ठेवली आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली सलग दोन वर्ष हा यात्रोत्सव खंडित झाला होता . परंतु यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा भाविकांची हनुमान जन्मोत्सवाला मोठी गर्दी होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पुऱ्या तळताना तरुण, कांदे चिरताना जेष्ठ मंडळी (छायाचित्रे : किशोर खुडे)

महाप्रसादाची जुनी परंपरा

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मंचर ते बेल्हे रस्त्यावर थोरांदळे गाव आहे . येथे हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो . या जन्मोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. जन्मोत्सवावेळी ‘ पुरी गुळवणीच्या ‘ महाप्रसादाची परंपरा जुनी आहे. ती ग्रामस्थांनी आजही टिकून ठेवली आहे. यंदा या हनुमान जन्मोत्सवानिमित्त ग्रामस्थांनी माणसी एक आठवा व उंबऱ्यामागे दोन आठवे अशा प्रमाणात गहू गोळा करून तो एकत्र करून पुन्हा घरोघरी वाटला आहे.

फडणवीसांच्या ट्विटचा मी आनंद घेतो, शरद पवारांचे मिश्किल प्रत्युत्तर

यंदा दोन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, आणि एक हजार किलो कांद्याची चटणी असा महाप्रसाद यात्रेकरू व भाविकांसाठी तयार करण्यात आला आहे . शुक्रवारी (दि. १५ ) रोजी सकाळी अकरा वाजल्यापासूनच हनुमान मंदिराच्या समोरील प्रांगणात थोरांदळे गाव, मळे, वस्त्यां मधिल महिला पुऱ्या लाटण्याचे काम करत होत्या. त्यानंतर दुपारी तरुण मंडळी पुऱ्या तळण्याचे, तर जेष्ठ नागरिक कांदा चिरण्याचे काम करत होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत हा महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते.

Power crisis in India : वीज संकटामुळे अनेक राज्ये अंधारात जाण्याची भिती; महाराष्ट्रसह पंजाब, यूपीत कोळशाची कमतरता

दोन वर्षांनंतर आज रंगणार जयंती महोत्सव

शनिवारी ( दि. १६ ) पहाटे पाच ते सात या वेळेत ह .भ. प . नंदू महाराज सोनवणे (रांजणी) यांचे हनुमान जन्माचे किर्तन होणार आहे . त्यानंतर सहा वाजून २१ मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित भाविकांना ‘पुऱ्या गुळवणीच्या ‘ महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी तीन ते सहा या वेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न होणार आहे. यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्याने जन्मोत्सवावेळी मोठी गर्दी होणार आहे. यासाठी माजी सरपंच सीताराम गुंड, सुरेश टेमगिरे, बाळासाहेब भिकाजी टेमगिरे, दामोदर टेमगिरे, डॉ दत्ता विश्वासराव, निलमताई टेमगिरे, श्रीराम टेमगिरे, संतोष टेमगिरे, ज्ञानेश्वर तुकाराम टेमगिरे, आदी ग्रामस्थांनी चांगले नियोजन केले आहे.

हेही वाचा

गुणरत्न सदावर्तेंना उचलताच पत्नी जयश्री पाटील गायब, मुंबई पोलिसांकडून शोध सुरू

ठाणे : नाश्ता दिला नाही म्‍हणून सासऱ्यानं केला सुनेवर गोळीबार; सुनेचा मृत्‍यू, सासरा फरार

PFI Ban : पीएफआयवर चालू आठवड्यात केंद्राकडून बंदी

Back to top button