नाशिक : सिडकोत विद्यार्थ्याने घेतला गळफास
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
परिसरातील उपेंद्रनगर भागात राहणार्या ऋषिकेश पंकज बिरार (22) याने रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा शहरातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात दुसर्या वर्षाला शिकत होता. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अतुल बनतोडे करीत आहेत. दरम्यान ऋषिकेशच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.