देवेंद्र फडणवीस : ‘कोल्हापूरमध्ये १२ तारखेला काय करायचं हे ठरलंय आणि ते भाजपला जिंकवणार’ | पुढारी

देवेंद्र फडणवीस : 'कोल्हापूरमध्ये १२ तारखेला काय करायचं हे ठरलंय आणि ते भाजपला जिंकवणार'

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्वादी मतदारसंघ आहे. शिवसेना आणि आम्ही एकत्र होतो त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, त्याला भाजपचा पाठिंबा होता. हा मतदारसंघ आमच्या विचाराला माननारा मतदारसंघ आहे. राजकारणात पोलिटीकल केमिस्ट्री चालते या मतदारसंघात नक्कीच भाजपला यश मिळेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापुरात भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचाराला आले असता त्यांनी भाजपचा विजयाचा दावा केला.

काल झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलला यश मिळाले. भाजपकडून आम्ही पृथ्वीराजला ५ लाखांचे बक्षिस जाहीर करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात दहशतीचे वातावरण आहे. पण मला विश्वास आहे कोल्हापूरचे लोक या दहशतीला न जुमानता भाजपला जोरदार मतदान करतील. राज्यातील परिस्थिती पाहिली तर राज्यात महाविकास आघाडीबद्दल लोकांचा रोष आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मंत्र्यांकडून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे १२ तारखेला लोकांचे काय करायचे हे ठरले आहे. असे फडणवीस म्हणाले. याचबरोबर १२ तारखेला जनताच महाविकास आघाडीला उत्तर देईल असेही ते म्हणाले.

आई अंबाबाईचा आम्हाला आशीर्वाद

कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे ते त्यांनी दाखवावे असा सवाल फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात झालेल्या कामानंतर कोल्हापुरात कोणतेही ठोस काम झाले नाही. महाविकास आघाडीने पुरग्रस्तांना मदत केली नाही. कोल्हापूरची पंचगंगा नदी त्यांना साफ करता आली नाही, अनेक कोल्हापूरची कामे प्रलंबित ठेवली आहेत.

नाना कदम १०७ वे उमेदवार म्हणून निवडून येतील यात शंका नाही. शिवेसेनेचे सगळे मतदार आमच्या सोबत आहेत त्यांना हिंदुत्वाबद्दल माहिती आहे.  पंढपूरला आम्हाला पांडूरंगाचा आशिर्वाद मिळाला तसा कोल्हापूर उत्तरसाठी आई अंबाबाई नाना कदम यांना निवडून देईल. नाना पटोले यांची न बोलता न पाहता बोलण्याची पद्धत आहे.

Back to top button