राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने नाशिकमधील मनसे नेत्याला फोनवरुन त्रास | पुढारी

राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने नाशिकमधील मनसे नेत्याला फोनवरुन त्रास

नाशिक  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्याला मज्जिदीवरील भोंगे काढा अन्यथा, त्यासमोरच हनुमान चालिसा लावू असे आवाहन केल्यानंतर अनेक मुस्लिम मनसे सैनिकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र नाशिकमधील मनसे नेते सलीम शेख यांनी ठाकरे यांच्या त्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. 

मात्र, राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने शेख यांना फोनवरुन त्रास दिला जात असल्याचे समजते. एका मुस्लिम युवकाने सलिम शेख यांना फोनकरुन प्रश्नांचा भडिमार केल्याचे समजते. तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही, तुमची डीएनए टेस्ट करुन घ्या असा सल्ला त्यांना फोन करणा-याने दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडवा मेळाव्याला मज्जिदीचे भोंगे काढावे अन्यथा हनुमान चालीसा लावा हे आवाहन केल्यानंतर राज्यात काही ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालीसा लावली. मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही मुस्लीम मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. नाशिक मधील मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत न्यायालयाच्या निर्णयानुसार, राज ठाकरे यांची भूमिका आहे. त्यांच्या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईला जाणार आहे. मज्जिदीवरचे भोंगे काढण्यावर ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी न्यायालयात जावे, असे देखील आवाहन सलीम शेख यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button