पुणे : पीएमपीच्या मिळकतींमधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही फटका | पुढारी

पुणे : पीएमपीच्या मिळकतींमधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही फटका

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपीच्या शहरात 9 इमारतींमध्ये 101 मिळकती आहेत. त्यातून पीएमपीला वार्षिक 11 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र, थकबाकीदार आणि कोरोनामुळे पीएमपीला यातून मिळणार्‍या उत्पन्नात फटका बसला आहे. यंदा फक्त 6 कोटी रुपयांपर्यंतचेच उत्पन्न पीएमपीला मिळाले आहे.

Pakistan Political Crisis : पाकिस्तानमधील राजकीय संकट टोकाला; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला राजीनामा

पीएमपीचे शहरात 14 डेपो

आहेत. या डेपोंसह 9 व्यावसायिक इमारती आहेत. त्याद्वारे पीएमपीला वार्षिक 10 ते 11 कोटींपर्यंत उत्पन्न मिळत असते. मात्र, मध्यंतरीच्या काळात गाळाधारकांकडून वाढलेल्या थकबाकीचा आणि कोरोनामुळे अनेकांनी गाळे खाली केल्यामुळे पीएमपीला मिळकतीमधून मिळणार्‍या उत्पन्नात फटका बसला आहे.

petrol diesel price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

दाव्यांमध्ये वाढ…

अनेक वर्षांपासून भाडे थकविल्यामुळे पीएमपीने बहुतांश गाळाधारकांना गाळ्यांमधून बाहेर काढले आहे. त्यामुळे पीएमपीच्या कोर्ट केस आणि आरडीसीकडील तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सध्या पीएमपीकडून 101 मिळकतींपैकी 83 मिळकती भाड्याने देण्यात आल्या आहेत, तर 18 मिळकती रिक्त आहेत.

नेत्‍यांनी मतभेद विसरुन पक्षाला भक्‍कम करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत : सोनिया गांधी

बहुतांश गाळाधारकांचे भाडे थकले आहे. त्यांच्याकडून भाडे वसूल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, संबंधितांना कोर्टाच्या नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, मालमत्ता विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यंदा कोरोना आणि थकबाकीदारांमुळे उत्पन्नाला फटका बसला आहे.
                                           – अनंत वाघमारे, मालमत्ता विभागप्रमुख, पीएमपीएमएल

संजय राऊत : तर कोल्हापूरकरांवर भाजी, मटण किती घेतलं यावर भाजपची नजर असेल

या आहेत व्यावसायिक इमारती

  • कॅन्टीन बिल्डिंग
  • स्वारगेट डेपो बिल्डिंग
  • प्राप्तिकर कार्यालय इमारत (विठ्ठलराव गाडगीळ भवन)
  • डेक्कन शिरोळे भवन
  • न. ता. वाडी डेपो इमारत
  • कोथरूड स्टँड इमारत
  • पुणे स्टेशन आगार इमारत
  • हडपसर आगार इमारत
  • मार्केट यार्ड इमारत

कर्नाटकात नवा वाद! ‘हलाल’ मांस विरोधानंतर आता मशिदीतील लाउडस्पीकरवर बंदीची मागणी

असे मिळाले उत्पन्न
  • सन 2018-19 – 7 कोटी 28 लाख 48 हजार 732
  • सन 2019-20 – 10 कोटी 98 लाख 29 हजार 963
  • सन 2020-21 – 11 कोटी 67 लाख 98 हजार 135
  • सन 2021-22 – 6 कोटी 86 लाख 29 हजार 78

Back to top button