Pakistan Political Crisis : पाकिस्तानमधील राजकीय संकट टोकाला; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला राजीनामा | पुढारी

Pakistan Political Crisis : पाकिस्तानमधील राजकीय संकट टोकाला; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला राजीनामा

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानमध्ये राजकीय संकट टोकाला (Pakistan Political Crisis) गेले असतानाच पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) मोईद यूसुफ (Moeed Yusuf) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर हॅडलवरुन दिली आहे.

पाकिस्‍तानच्‍या राष्‍ट्रपतींनी संसद बरखास्‍त केली आहे. त्‍यामुळे आता काळजीवाहू पंतप्रधान म्‍हणून अजमत सईद यांचे नाव आघाडीवर आहे. इम्रान खान यांच्‍या तहरीक-ए-इन्‍साफ पक्षाने काळजीवाहू पंतप्रधान म्‍हणून माजी न्‍यायमूर्ती अजमत सईद यांचे नाव सूचवले आहे. याच दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

युसूफ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पद सोडत आहे आणि मी अत्यंत समाधानी आणि समाधानी आहे. कारण मला माहित आहे की NSA’s office आणि NSD या ख्यातनाम संस्था आहे. इथे एक चांगली टीम काम करते. त्यामुळे पाकिस्तानचा अभिमान कायम राहील.
उच्च पदावर राहून देशाची सेवा करण्याची संधी मिळण्याचे भाग्य फार कमी लोकांना मिळते. अल्लाहच्या कृपेने मला हा सन्मान तर मिळालाच, पण अडीच वर्षांचा हा अतुलनीय प्रवास आहे, ज्याचा मी नेहमीच आदर करीन, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

युसूफ यांनी पाकिस्तानचे नववे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहिले. युसूफ यांनी जानेवारीत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण सादर केले होते.

पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्‍या विरोधातील (Pakistan Political Crisis) अविश्‍वास प्रस्‍ताव फेटाळण्‍याच्‍या निर्णयाविरोधातील याचिकेवर पाकिस्‍तान सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. संसदेमध्‍ये घडलेल्‍या घटनांची समीक्षा होणे आवश्‍यक आहे, असे कोर्टाने स्‍पष्‍ट केले आहे.

 

Back to top button