अनन्या पांडेचा ब्रेकअप? | पुढारी

अनन्या पांडेचा ब्रेकअप?

नवी दिल्ली ः बॉलीवूडमध्ये नाते तयार होण्यास आणि ते बिघडण्यास वेळ लागत नाही. नेमके असेच अनन्या पांडे आणि इशान खट्टर यांच्याबाबतीत घडले. हे दोघेही एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करत होते. तसेच ते पार्टी ते सुट्टीवर असतानाही एकत्र दिसत होते. काही दिवसांपूर्वी शाहीद कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इशान व अनन्या एकत्रपणे पोहोचले होते. अनेक छायाचित्रे याचे साक्षीदार आहेत. मात्र, आता असे समजते की, अनन्या व इशान यांनी हे नाते आता संपुष्टात आणले आहे.

अनन्या व इशान हे गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. ‘खाली पिली’च्या सेटवर त्यांचे रिलेशन आणखी घट्ट झाले. तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर या दोघांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही हा निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेतला. यामुळे त्यांच्या नात्याचा सकारात्मक शेवट झाला तरी ते यापुढे चांगले मित्र राहणार आहेत.

दरम्यान, अनन्याचा ‘गहराईयाँ’ हा चित्रपट अलीकडेच रीलिज झाला आहे. यामध्ये तिने दीपिका पदुकोन, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा यांच्यासोबत काम केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button