नाशिक : रेल्वे अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार चौकशी | पुढारी

नाशिक : रेल्वे अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार चौकशी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा : लोहशिंगवे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या पवन एक्स्प्रेस अपघाताची चौकशी उद्यापासून (दि. 6) केली जाणार आहे. मुंबई सेंट्रल सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज आरोरा नाशिकमध्ये दाखल होऊन या अपघाताची चौकशी करणार आहेत.

मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेसला लोहशिंगवे स्टेशनजवळ रविवारी (दि. 3) दुपारी तीनला भीषण अपघात होऊन 11 डबे रुळावरून घसरले होते. त्यात एक प्रवासी ठार, तर सहा जण जखमी झाले होते. या अपघाताची चौकशी 6 एप्रिलपासून सुरू होत आहे.

अपघात का झाला, कसा झाला, मानवी चूक होती की यांत्रिक, याची चौकशी केली जाईल. मुंबई सेंट्रल सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा 6 एप्रिलला सकाळी 10 वाजता नाशिकला येऊन या अपघाताची चौकशी करणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. नागरिक, रेल्वे कर्मचारी यांना घटनेबद्दल माहिती असल्यास त्यांनी रेल्वे सुरक्षा आयुक्तांसमोर उपस्थित राहावे किंवा रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मुंबई कार्यालयात 022-22056058 या नंबरवर फॅक्स करा किंवा दूरध्वनी क्रमांक 022/22056058 वर वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा किंवा या लीीलर्लाीालरळऽसारळश्र.लेा या मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button