सनी लिओनने खरेदी केले ‘स्वप्नातील घर’ | पुढारी

सनी लिओनने खरेदी केले ‘स्वप्नातील घर’

नवी दिल्ली ः सनी लिओन आणि तिचा पती डॅनिएल वीबर यांनी गतसाली मुंबईत एक नवे घर खरेदी केलेे. यासंदर्भात बोलताना सनीने सांगितले की, होय आम्ही नवे घर खरेदी केले आहे. कारण आम्ही आमच्या मुलांना एक ठोस बेस देऊ पाहतोय. दरम्यान, बॉलीवूडमध्ये एक दशक पूर्ण करणारी सनी गेली काही वर्षे भाड्याच्या घरातच राहत होती. मात्र, आता तिने मुंबईत तीन बेडरूमचे लॅविश पेंटहाऊस खरेदी केले आहे. याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

सनी लिओन सध्या दक्षिणेकडील काही प्रोजेक्टस्मध्ये व्यस्त आहे. तिने आपल्या घरासंदर्भात बोलताना सांगितले की, मुंबईत घर घेण्याचा आमचा निर्णय एकदम भावनिक होता. कारण हे आमचे प्रमुख घर आहे. जेथे आम्ही जास्त वेळ घालवत असतो. आम्हाला तीन मुले आहेत. एक अपार्टमेंटपासून दुसर्‍या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होऊन आम्ही आमच्या मुलांना ठोस बेस देऊ शकणार नाही. तसेच मुलांना असे स्थळ देण्याचा आमचा प्रयत्न होता की, मुले त्याच्यावर प्रेम करतील.

हेही वाचलंत का? 

Back to top button