HBD Pallavi Joshi : पल्लवीला पहिल्या भेटीत आवडले नव्हते विवेक अग्निहोत्री | पुढारी

HBD Pallavi Joshi : पल्लवीला पहिल्या भेटीत आवडले नव्हते विवेक अग्निहोत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटात राधिका मेननची भूमिका पार पाडणाऱ्या पल्लवी जोशीचा ४ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. (HBD Pallavi Joshi) पल्लवीने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (HBD Pallavi Joshi) ती बहुतांशी सहाय्यक भूमिकांमध्ये दिसली असली तरी तिला ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून वेगळी ओळख मिळाली. पल्लवी जोशी ही दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहे. पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. चला तर मग जाणून घेऊया दोघांची भेट कशी झाली?

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पल्लवी एक टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. तिने लहान वयातच रंगमंचावर सादरीकरण करण्यास सुरुवात केली. बदला आणि आदमी सडक का यासारख्या चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केले. दादा (१९७९) या चित्रपटात तिने एका अंध मुलीची भूमिका केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आणि आपले नाव कमावले. ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटासाठी पल्लवीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

१९८० आणि १९९० च्या दशकाच्या सुरूवातीस, पल्लवीने रुक्मावती की हवेली, सूरज का सातवा घोडा, त्रिशगनी (१९८८), वंचित, भुजंगयन दशावतारा (१९९१), सौदागर, पान, तहलका, मुजरिम, अंधायुद्ध, चोकरी (१९९२) मध्ये काम केले. तिने झी मराठीवरील सा रे ग म प मराठी लिटिल चॅम्प ही टेलिव्हिजन गायन स्पर्धा देखील होस्ट केली आहे. तिने टीव्ही मालिका ‘अल्पविराम’ केली. यामध्ये तिची अत्याचार पीडितेची भूमिका होती. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या द मेकिंग ऑफ द महात्मा या चित्रपटात ती कस्तुरबा गांधींच्या भूमिकेत दिसली होती.

पल्लवीचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण मुंबईतून झाले. पुढे ती पदवीधर झाली.

विवेक अग्निहोत्री असे पडले प्रेमात

पल्लवीने १९९७ मध्ये चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीशी लग्न केले. रॉक कॉन्सर्टमध्ये पल्ल्वी आणि विवेक अग्निहोत्री यांची भेट झाली होती. तेथे त्यांच्या एका कॉमन फ्रेंडने आमंत्रित केलं होतं. पल्लवीला सुरूवातीला विवेक अग्निहोत्री पसंत पडले नव्हते. ती त्यांना एक एरोगेंट व्यक्ती समजायची. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केले

यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे पल्लवी आणि विवेक अग्निहोत्री यांचा विवाह २८ जून १९९७ रोजी झाला. या जोडप्याला दोन मुलेही आहेत.

Back to top button