अमरावती : जावयाने केली सासुची हत्या

अमरावती : जावयाने केली सासुची हत्या
Published on
Updated on

अमरावती : पुढारी वृत्तसेवा  पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या सासुची जावयानेच हत्या केली. ही धक्कादायक घटना वरुड तालुक्यातील शेंदुरजना घाटच्या मलकापुरात (शनिवार) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रकला संतलाल तुमडाम (वय 60, रा. मलकापूर पुनर्वसन, वरुड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयीत आरोपी जावई जिवनू रिमकलाल धुर्वे (वय 38, रा.चरनेटी दगाडिया, ता. मोक्कड, जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश) याला अटक केली आहे.

सासुच्या डोक्‍यात मारली काठी 

मृतक चंद्रकला यांचा मुलगा सुनील संतलाल तुमडाम (30, रा. मलकापूर पुनर्वसन) याने या घटनेची तक्रार आज (रविवार) सकाळी शेंदुरजना घाट पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार, त्यांची बहीण फुलवती ही पतीच्या त्रासामुळे सासर सोडून मलकापूरला राहायला आली होती. दरम्यान घटनेच्या दिवशी बहिणीचे पतीशी भांडण सुरु होते. दरम्यान त्यांच्या भांडणात मध्यस्तीसाठी गेलेल्या चंद्रकला यांच्या डोक्यावर जावई जिवनु धुर्वेने काठी मारली. यामध्ये चंद्रकला यांचा मृत्यू झाला. या नंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयीत आरोपीचा शोध कार्य सुरु केला.

जावयाला केली अटक… 

पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव व मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सतीश इंगळे, पोलिस कर्मचारी शुभांगी थोरात, लक्ष्मण साने, देविदास उईके, रत्नदीप वानखडे, अमोल गंधे, वसीम शेख, अशोक सांगळूदकर, पंकज झाडे, विलास कोहले, चंद्रकांत केंद्रे, स्वप्नील बायस्कर यांनी या संशयीत आरोपीला अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news