जिंदगी ‘गुलजार’ है ! फक्त या महिला IAS अधिकाऱ्यासारखं मनसोक्त नाचता आलं पाहिजे (video) | पुढारी

जिंदगी 'गुलजार' है ! फक्त या महिला IAS अधिकाऱ्यासारखं मनसोक्त नाचता आलं पाहिजे (video)

तिरूअनंतपुरम ; पुढारी ऑनलाईन : IAS-IPS झालेले कित्येक अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. अशातच अजून एक महिला अधिकारी यांचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या या व्हिडीओने केरळ राज्यातच नाही तर देशभरात चर्चा सुरू आहे. केरळच्या Pathanamthitta जिल्ह्याच्या कलेक्टर डॉक्टर दिव्या एस. अय्यर (IAS divya iyer) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

डॉक्टर दिव्या एस. अय्यर या विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी डान्सचा कार्यक्रम ठेवला होता, जसं विद्यार्थी नाचू लागले तसा जिल्हाधिकाऱ्यांना मोह आवरला नाही त्याही थेट विद्यार्थ्यांमध्ये येत डान्स करू लागल्या. दरम्यान त्यांनी गाण्यावर धरलेल्या ठेक्यामुळे सगळेच आश्चर्याने बघू लागले होते.

IAS divya iyer : नगाडा संग ढोल बाजे या गाण्यावर धरला ठेका

हा व्हिडिओ एमजी विद्यापीठाचा आहे. या व्हिडिओमध्ये डॉ.दिव्या ‘नगाडा संग ढोल बाजे’ मध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत विद्यार्थीही नाचत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्या म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांसोबत डान्स करून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कॉलेजचा युवा महोत्सव मला आठवल्याचे ही त्या म्हणाल्या.

ज्यावेळी जिल्हाधिकारी अय्यर डान्स करत होत्या त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि मुलेही तिथे उपस्थित होते. जिल्हाधिकारी अय्यर यांचा डान्स त्यांच्या मुलांना खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अनिरूद्ध नावाचा एक विद्यार्थी म्हणाला की, मी ही या फ्लॅश मॉबमध्ये सहभागी झालो होतो. जेव्हा डॉ. दिव्या मॅडम आमच्यासोबत आणि ग्रुपसोबत डान्स केला तेव्हा प्रत्येकजण खूप प्रेरित झाला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही लोक त्यांचे चाहते झाले आणि त्यांनी आयएएस दिव्या यांच्या साधेपणाचे कौतुक केल्याचे तो म्हणाला.

Back to top button