Dhaniya : कोथिंबिरीला भारताची राष्ट्रीय वनस्पती घोषित करा, सोशल मीडियावर सुरु आहे मोहीम | पुढारी

Dhaniya : कोथिंबिरीला भारताची राष्ट्रीय वनस्पती घोषित करा, सोशल मीडियावर सुरु आहे मोहीम

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोंथिबीर हा प्रत्येक भारतीय घरातील किचनमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक भाजी, कोशिंबीर आणि कोणत्याही प्रकारच्या चटणी करण्यासाठी हमखास कोंथीबीर वापरली जाते. कोथिंबीर हा घटक भारतीय ‘किचनमधली सुपरस्टार’ आहे. म्हणून कोथिंबिरीला ‘भारताची राष्ट्रीय वनस्पती’ म्हणून घोषित करा, अशी मागणी एका वेबसाईटवरून भारतातल्या प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांनी अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री पशुपती कुमार पारस (अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय) यांच्याकडे केली आहे.

शेफ रणवीर ब्रार यांनी The world’s platform for change या वेबसाईटवर “कोथिंबिरीला भारताची राष्ट्रीय वनस्पती घोषित करा” असे आवाहन करत मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेला आतापर्यंत, 21 हजारहून अधिक जणांनी पाठिंबा दिला आहे. 25,000 स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्यास, ही मोहीम सर्वाधिक स्वाक्षरी केलेल्यांपैकी एक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

https://www.change.org/ यावरून केलेल्या आवाहनामध्ये शेफ रणवीर यांनी म्हटले आहे की, जर तुम्ही आज घरात कोणताही पदार्थ शिजवलात, तर तुम्ही त्यात कोथिंबीर टाकता किंवा एखाद्या पदार्थावर सजावटीसाठीही कोथिंबिरीचा वापर करता. कोथिंबिरीला भारतीय धनिया, कोठामाली, कोथिंबीर या नावाने ओळखतात. कोथिंबीर तुमच्या स्वयंपाकघरातील सुपरस्टार आहे ती स्वादयुक्त औषधी वनस्पतीदेखील स्वादांनी आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक भारतीयाला जवळजवळ सर्वच खाद्यपदार्थांमध्ये कोथिंबीर आवडते.

कोथिंबीर ही फक्त चवच देत नाही तर कोथिंबीर हे सुपरफूड देखील आहे. अँटीमाइक्रोबियल, अँटी-ऑक्सिडंट, डायबेटिक-विरोधी, चिंता-विरोधी, अपस्मारविरोधी, उदासीनता विरोधी, उत्परिवर्ती विरोधी, दाहकताविरोधी, हायपरटेन्शनविरोधी, न्यूरो-संरक्षक आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कोथिंबीर ओळखली जाते. तसेच मधुमेह नियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. कोथिंबीरीत असे अनेक औषधी गुणधर्म असल्या कारणाने कोथिंबीरला भारताची राष्ट्रीय वनस्पती म्हणून घोषित करावी, असे शेफ रणवीर ब्रार म्हणतात.

कोथिंबिरीला राष्ट्रीय औषधी वनस्पतीचा दर्जा देण्यासाठी याचिकेवर सही करा! जी औषधी वनस्पती प्रत्येक स्वादिष्ट पदार्थाला चवदार बनवते आणि आपल्या मनाला आनंद देते, तिला खरोखरच तिचा गौरव मिळायला हवा. तर कुठे जाऊन कोथिंबिरीला योग्य दर्जा मिळेल, नाहीतर तुम्हीच पुन्हा मला म्हणाल, “रणवीर आपने बात नहीं” “मला माहित नाही की बदल होईल की नाही, परंतु कमीतकमी कोथिंबिरीवर संभाषण तरी सुरू होईल, असे शेफ रवणीर ब्रार Change.org वर केलेल्या आवाहनावर म्हणतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Brar (@ranveer.brar)

हेही वाचलत का ?

 

 

Back to top button