ladakh Earthquake : लडाखला भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्‍ये घबराट | पुढारी

ladakh Earthquake : लडाखला भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्‍ये घबराट

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

केंद्रशासित प्रदेश लडाखच्‍या काही  (Earthquake in Ladakh) भागात आज (दि. २९) सकाळी भूकंपाचा धक्का बसला.  कोणत्याही स्वरुपाची जीवीत आणि वित्त हानी झालेली नाही; पण भागात एका महिन्यात दोनवेळा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या (National Center for Seismology) माहितीनुसार, आज सकाळी ७:२९ च्या दरम्यान आल्ची (लेह) पासुन १८६ किमी उत्तरेकडे चीन-भारत सीमा भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ४.३ रिश्टर स्केल (Richter Scale) एवढी त्‍याचीतीव्रता नाेंदली गेली आहे .यामुळे कोणतीही जीवीत आणि वित्त  नुकसान झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. याच्या अगोदरही लडाख या भौगोलिक भागात १६ मार्च रोजी  भूकंपाचा हादरा बसला होता. ५.२ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची  तीव्रता नोंदवण्यात आली होती.
हवामान विभागानुसार हा भूकंप सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी आला होता. काही सेकंद याची तीव्रता जाणवली. भूकंपाचा केंद्र ३६.०१ डिग्री उत्तर अक्षांश आणि ७५.१८ डिग्री पूर्व अंतरावर होते. तर जमिनीमध्ये ११० किलोमीटर खोलवर त्याची तीव्रता होती.
हेही वाचलंत का? 

Back to top button