पंचवटी एक्सप्रेसचे 10 डबे जनरल ; मासिक पासधारकांसाठीही महत्वाचा निर्णय | पुढारी

पंचवटी एक्सप्रेसचे 10 डबे जनरल ; मासिक पासधारकांसाठीही महत्वाचा निर्णय

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसच्या 20 डब्यांपैकी 10 डबे जनरल करण्यात आले असून, मासिक पासधारकांसाठीदेखील 2 डबे जोडण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करणारे सर्वसामान्य प्रवाशांसोबत दररोज अप-डाउन करणार्‍या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने आता गोदावरी एक्स्प्रेस आणि मनमाड-इगतपुरी शटलदेखील लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

मनमाड येथून सकाळी 6 वाजता सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस ही मनमाड, नांदगाव, लासलगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी यांसह इतर गावांच्या प्रवाशांची लाइफलाइन मानली जाते. या गाडीतून दररोज शेकडो सर्वसामान्य प्रवाशांसोबत चाकरमाने प्रवास करतात. मात्र, कोविडमुळे इतर रेल्वेप्रमाणे ही गाडी बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोना आटोक्यात आल्यानंतर गाड्या सुरू केल्या जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी पंचवटी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, चाकरमान्यांना मासिक पास दिले जात नव्हते.

शिवाय सर्वसामान्य प्रवाशांना रिझर्व्हेशन करून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत होता. प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेस साधारण तिकीट आणि मासिक पास देण्यास सुरुवात तर केलीच शिवाय 20 डबे असलेल्या या गाडीत 10 डबे साधारण ठेवण्यात आले. शिवाय मासिक पासधारकांसाठी 2 डबेदेखील जोडण्यात आल्याची माहिती सीआयए मीणा यांनी दिली. पंचवटीप्रमाणे गोदावरी एक्स्प्रेस आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्त्वाची असलेली मनमाड-इगतपुरी शटल सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली जात

हेही वाचा :

Back to top button