IPL 2022 : आयपीएल चाहत्यांना ‘कोरोना’ देणार पुन्हा मोठा धक्का! | पुढारी

IPL 2022 : आयपीएल चाहत्यांना ‘कोरोना’ देणार पुन्हा मोठा धक्का!

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे यंदा आयपीएल (IPL 2022) चे सामने फक्त चारच स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. बीसीसीआय (BCCI) प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. सगळे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. पण कोरोनाचे रुग्ण वाढत गेले तर आयपीएलचे काय होणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच कोरोनाच्या चौथ्या एका लाटेचा धोका वाढला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात भारतातही कोरोनाचे सतराशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे २६ हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. ज्यामुळे चिंता निर्माण झाली. महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांच्या मते, सध्या परिस्थिती ठीक आहे, परंतु सत्य हे आहे की परिस्थिती खूप वेगाने बदलू शकते. महाराष्ट्रात जवळपास सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, इस्रायलमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला असून चीन-कोरियासारख्या देशांमध्ये पुन्हा झपाट्याने कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होत आहे. (IPL 2022)

केंद्राची महाराष्ट्राला सूचना..

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या १५ व्या हंगामाला २६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या या च्या 15 व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रात होणार आहेत. अशातच केंद्र सरकारनेही महाराष्ट्र राज्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे २६ मार्च पासून सुरु होणा-या आयपीएल स्पर्धेतील सामन्यादरम्यान प्रेक्षकांना परवानगी नाकारण्याचे राज्य सरकारने निर्देश देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यावेळचे सामने देखील प्रेक्षकांविना रंगतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आयपीएल पुन्हा एकदा प्रेक्षकांविना रंगण्याची चर्चा रंगू लागली आहे.

यंदा आपीएल (IPL 2022) सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथील स्टेडियमवर रंगणार आहेत. स्पर्धेतील ५५ साखळी सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळविण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षक क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांसाठीची परवानगी महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला दिली आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दिलेल्या सतर्कतेच्या सूचनांमुळे यावेळचे सामने देखील प्रेक्षकांविनाच पार पडतात की काय अशी शंका उपस्थित झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत.

टीममधील एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर

IPL सुरू झाल्यानंतर एखाद्या टीममध्ये एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर काय होणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. नवीन नियमानुसार, सामना सुरू होण्याआधीच एखाद्या टीममध्ये कुणाला कोरोनाची लागण झाली आणि ती टीम १२ खेळाडू उभे करू शकली नाही तर काही गोष्टी बदलू शकतात.

सामन्याआधी प्रत्येक टीमला १२ खेळाडूंची नावं जाहीर करणं बंधनकारक असतं. यामध्ये ११ खेळाडू हे प्रत्यक्ष मैदानावर खेळणारे तर एक जण बदली असतो. यामध्ये ७ खेळाडू भारतीय असणं आवश्यक असतं. हे सगळे म्हणजे १२ खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तर सामन्याची तारीख बदलली जाऊ शकते. कोरोनामुळे एखादी टीम प्लेइंग इलेव्हन बनवू शकली नाही, तर सामन्याचं वेळापत्रक बदललं जाईल. त्यानंतरही सामना होऊ शकला नाही, तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवलं जाईल. बोर्डाने म्हटलं आहे, की एखाद्या टीममध्ये प्लेइंग इलेव्हन खेळाडू नसतील, तर तो सामना नंतर होईल आणि त्यानंतरही तो झाला नाही तर तांत्रिक समिती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य करावा लागेल.

यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली तर दोन्ही टीम्सना दोन-दोन पॉइंट्स दिले जात होते; पण आता कोरोनामुळे हा नवीन नियम बनविण्यात आला आहे. याशिवाय IPL दरम्यान प्रत्येक टीमला बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे. प्रत्येक टीमसाठी वेगवेगळ्या हॉटेलची व्यवस्था केली गेली आहे. त्याशिवाय सामन्याआधी सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जाईल. कोरोनाच्या सावटामुळे यंदाच्या IPL च्या मॅचेस मुंबईतल्या तीन आणि पुण्यातल्या एका स्टेडियमवर खेळवल्या जाणार आहेत. IPL ची कोणताही सामना कोरोनामुळे रद्द होऊ नये अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे.

Back to top button