Shardul Thakur Troll : रोहित शर्माची पत्नी रितिकाने शार्दुल ठाकूरला दिली धमकी, म्हणाली…

Shardul Thakur Troll : रोहित शर्माची पत्नी रितिकाने शार्दुल ठाकूरला दिली धमकी, म्हणाली...
Shardul Thakur Troll : रोहित शर्माची पत्नी रितिकाने शार्दुल ठाकूरला दिली धमकी, म्हणाली...
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. व्यंकटेश अय्यरने आवेश खानसोबतचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. दुसरीकडे, शार्दुल ठाकूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने एक उत्तम कॅप्शनही दिले आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि युजवेंद्र चहल यांनी त्याला ट्रोल केले आहे. (Shardul Thakur Troll)

चेन्नई सुपर किंग्जच्या 2018 आणि 2021 च्या दोन आयपीएल विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर, शार्दुल ठाकूर आता 26 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अशाच प्रकारे खेळण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात बंगळूरमध्ये दोन दिवसांच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स (DC)ने त्याला 10.75 कोटींना विकत घेतले होते. (Shardul Thakur Troll)

शार्दुल ठाकूरने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत दिलेले कॅप्शनही खूपच मनोरंजक आहे. शार्दुलने शेअर केलेल्या फोटोमध्ये उजव्या बाजूला रहाणे, डावीकडे रोहित आणि मध्यभागी स्वत: शार्दुल दिसत आहे. हा फोटो शेअर करत शार्दुलने लिहिलंय की, 'बॉडीगार्ड असणे हा प्रसिद्ध होण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, मला असे वाटते.' (Shardul Thakur Troll)

शार्दुलवर रितिकाचा निशाणा? (Shardul Thakur Troll)

या फोटोवर रितिकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, 'तुला माहित आहे की काय येत आहे.' रोहितच्या पत्नीचा कदाचित वर्ल्ड कपकडे इशारा असेल, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर चहलने लिहिलंय की, 'बॉडीगार्डची बॉडी कुठे आहे ठाकूर साहेब.'

दरम्यान, शार्दुल दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडला गेला आहे. त्याच्यासोबत डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल, चायनामन गोलंदाज कुलदीप यादव, यष्टिरक्षक-फलंदाज आणि कर्णधार ऋषभ पंत यांचाही समावेश आहे. IPL 2022 च्या 15 व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सला यश मिळवायचे असेल, तर त्यात शार्दुल ठाकूरची भूमिका महत्त्वाची असणार आहे. बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत तो संघासाठी चांगली कामगिरी करेल अशी फ्रँचायझीला आशा आहे.

30 वर्षीय शार्दुलला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोरखिया, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान, आश्वासक वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी, स्टार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श यांच्यासोबत खेळावे लागेल. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर 27 मार्च रोजी पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news