देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७३ टक्क्यांवर!, २४ तासांत २ हजार ५२८ नवे रुग्ण | पुढारी

देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७३ टक्क्यांवर!, २४ तासांत २ हजार ५२८ नवे रुग्ण

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : देशात गुरूवारी दिवसभरात २ हजार ५२८ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १४९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ३ हजार ९९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७३% नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.४०% नोंदवण्यात आला.

देशाातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २९ हजार १८१ (०.०७%) पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ५८ लाख ५४३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ५ लाख १६ हजार २८१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८० कोटी ९७ लाख ९४ हजार ५८८ डोस देण्यात आले आहेत. तर, १२ ते १४ वयोगटातील ९ लाख बालकांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. खबरदारी म्हणनू आतापर्यंत २ कोटी १६ लाख ३१ हजार १९६ बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८३ कोटी २७ लाख २५ हजार ६० कोरोना डोस पैकी १७ कोटी २२ लाख २५ हजार १९६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ( २ हजार ५२८ कोरोनाबाधितांची भर )

हेही वाचलंत का? 

Back to top button