Prateik Babbar : ‘सर्व काही चुकलं’, ब्रेकअपवर प्रतीकचा मोठा खुलासा | पुढारी

Prateik Babbar : 'सर्व काही चुकलं', ब्रेकअपवर प्रतीकचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बर (prateik babbar) हा इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याला आपल्या आई-वडिलांप्रमाणे फिल्मी जगात यश मिळवता आले नाही. या अभिनेत्याने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. लहानपणी आई गमावण्याचे दु:ख आणि नंतर मादक पदार्थांचे व्यसन आणि नैराश्यापर्यंत वाढलेल्या प्रतीकने (prateik babbar) त्याच्या आयुष्यातील अनेक कठीण टप्पे पाहिले आहेत. दरम्यान, त्याने अलीकडेच त्याच्या एका मुलाखतीत त्याच्या ब्रेकअपबद्दल सांगितले आणि त्याला त्याचा तो वाईट काळ आठवला.

अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेकअपबद्दल अभिनेत्याने खुलासा केला. प्रतीक आणि एमी रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘एक दीवाना था’ मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रतीक एमीच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. २०१२ मध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांनी बरीच चर्चा केली होती.

अलीकडेच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने सांगितले की, ब्रेकअपनंतरचा हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. त्यावेळी तो डिप्रेशनमध्ये गेला होता. प्रतीकच्या म्हणण्यानुसार, ‘एक दिवाना’ था हा खूप चांगला चित्रपट होता. पण तो एमीच्या प्रेमात पडला आणि तिथूनच गोष्टी आणखी बिघडल्या. प्रतीक म्हणाला की, मी म्हणू शकतो की वाईट अवस्था तेव्हाच सुरू झाली जेव्हा हृदय तुटले. त्यावेळी तो फक्त २५ वर्षांचा होता.

मुलाखतीदरम्यान प्रतीकने एमीचे कौतुकही केले. एमी जॅक्सनला जगातील सर्वात सुंदर मुलगी असल्याचे सांगताना प्रतीक म्हणाला की, ती मनानेही खूप साधी आहे. अभिनेत्याच्या मते, त्याची ही प्रेमकथा ‘एक दिवाना था’ होती आणि आता ती ‘एक दिवानी है’ म्हणून सादर केली जाऊ शकते.

एमीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, प्रतीकने 2019 मध्ये त्याने त्याची गर्लफ्रेंड सान्या सागरशी लग्न केले. दोघांनी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केले होते. दुसरीकडे, एमी जॅक्सनबद्दल बोलायचे तर ती तिच्या जोडीदारासह खूप आनंदी आहे आणि तिला २ वर्षांचा मुलगाही आहे.

त्यावेळी एमीची झाली होती खूप चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. एमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीची खूप चर्चा झाली ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. एमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे हे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंनी तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

एमीने तिचे टॉपलेस फोटो इन्स्टावर शेअर केले होते. एमीच्या या फोटोला फार कमी वेळात खूप लाईक्स मिळाले होते. एमीच्या बोल्ड स्टाइलने तिच्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित केले आहे.

याआधीही एमीने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिची गणना बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींमध्ये केली जाते. आई झाल्यानंतर ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही.

एमीने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एमी जॅक्सनने अक्षय कुमारपासून दक्षिणेतील अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.

एमी तिच्या लॉन्ग टाईम बॉयफ्रेंडच्या मुलाची आई झाली आहे. तो आता तिचा होणारा पती जॉर्ज पनायतो आहे. यापूर्वी ती जॉर्ज पनायटूसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती.

Back to top button