जत : लग्नाचे आमिषाने बलात्कार; तरुणावर गुन्हा दाखल | पुढारी

जत : लग्नाचे आमिषाने बलात्कार; तरुणावर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : व्हाॅट्स अप आणि इंस्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी करेवाडी (कोंत्येबोबलाद) येथील एका सैन्यदलात नोकरीस असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. शांताप्पा विठोबा शेंडगे (वय-२७) असे संशयिताचे नाव आहे.हे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करेवाडी (कोंत्येबोबलाद) येथील शांताप्पा शेंडगे हा सैन्यदलात नोकरीस आहे . त्याची इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणीसोबत ओळख झाली. या ओळखीच्या गैरफायदा घेऊन संबंधित तरुणीस “मला तू आवडतेस, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही”, असे म्हणत ९ डिसेंबर २१ रोजी जत येथे पीडितेला बोलावून घेतले. (जत)

यानंतर एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगू नकोस, सांगितल्यास तुझे बरे-वाईट करीन, अशी धमकीही तिला दिली,, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, संशयित आरोपी शांताप्पा याने पीडित तरुणीला वारवार लग्नाचे आमिष दाखवून व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल, चॅटिंग सुरू ठेवले.

नंतर त्याचे एका मुलीशी लग्न जमले. याबाबतची माहिती पीडित तरुणीला मिळाल्याने तिने याबाबत शांतापाला विचारणा केली असता त्याने धमकावले. इतकंच नाही पीडित तरुणीच्‍या नातेवाईकांनीदेखील  धमकी दिली. दरम्यान, संशयित आरोपी गावातून फिरत आहे, त्याला अद्याप अटक केलेली नाही. आरोपीस अटक करून न्याय मिळावा, अशी मागणी पीडित तरुणीने वरिष्ठ पोलीस कार्यालयाकडे केली आहे.

हेही वाचलं का?

Back to top button