तारक मेहता फेम ‘सोढी’ गुरुचरण सिंग २५ दिवसांनंतर घरी परतले | पुढारी

तारक मेहता फेम 'सोढी' गुरुचरण सिंग २५ दिवसांनंतर घरी परतले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सोढी उर्फ ​​गुरुचरण सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुरुचरण २२ एप्रिलपासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. आता २५ दिवसांनंतर अभिनेता गुरुचरण सिंग घरी परतले आहेत. अनेक दिवस बेपत्ता राहिल्यानंतर हा अभिनेता स्वतःहून घरी परतला आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि अभिनेत्याने सांगितले की, तो धार्मिक प्रवासाला गेला होता. या काळात ते अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये राहिले. जेव्हा त्यांना जाणीव झाली की, आथा थांबायला पाहिजे आणि ते घरी परतले. ते आपल्या वडिलांकडे परतले आहेत.

गुरुचरण सिंग घरी परतले

गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याने त्यांचे सहकलाकार आणि चाहते खूप चिंतेत होते. आता घरी परतल्यावर सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. घरी परतल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली. सांसारिक व्यवहार सोडून धार्मिक प्रवासाला निघाल्याचे गुरुचरण यांने पोलिसांना सांगितले. या प्रवासादरम्यान अभिनेता अमृतसर, लुधियाना आणि इतर अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये अनेक दिवस राहिला. त्यानंतर ते आपल्या वडिलांकडे घरी परतले.

२२ एप्रिलपासून बेपत्ता होते गुरुचरण सिंग

गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होते आणि ते मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. पण, ते मुंबईला गेले नाहीत. आणि घरीदेखील परतले नाहीत. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलिस त्यांना शोधत होती. तपासादरम्यान, त्यांचा मोबाईल फोन बंद होता. त्यामुळे त्यांना शोधणे कठीण होते. हेदेखील समजले की, ते अनेक ई-मेल अकाऊंटचा वापर करत होते. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते शेवटी ई-रिक्शा बदलताना दिसले होते.

हेदेखील वाचा-

Back to top button